Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी लेखक - दिग्दर्शक कौस्तुभ किशोर कुलकर्णी यांच्या पुण्यात सुरु असलेल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
- 29 Jan 2021
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी लेखक - दिग्दर्शक कौस्तुभ किशोर कुलकर्णी यांच्या पुण्यात सुरु असलेल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी चित्रपट महामंडळाचे लवाद समिती सदस्य अण्णा गुंजाळ व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
शुभम फिल्म प्रोडक्शन निर्मित व गणेश शिंदे दिग्दर्शित एकदम कड्क या मराठी चित्रपटाच्या सेटवर शेवटच्या दिवशी अखिल भारतीय चित्रपट महामंळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी भेट देऊन टिमला शुभेछा दिल्या
- 29 Jan 2021
शुभम फिल्म प्रोडक्शन निर्मित व गणेश शिंदे दिग्दर्शित एकदम कड्क या मराठी चित्रपटाच्या सेटवर शेवटच्या दिवशी अखिल भारतीय चित्रपट महामंळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी भेट देऊन टिमला शुभेछा दिल्या. त्यावेळीं अभिनेते पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज शेख ,चिन्मय संत. अभिनेत्री.. गायत्री जाधव ,भाग्यश्री मोटे ,जयश्री ,शशांक शेंडे ,माधव अभ्यंकर..आ. दिग्दर्शक अमित कोळी . नृत्य दि्दर्शक ढे उत्तेकर .कला दिग्दर्शक अनिल वणवे आदि टिम उपस्थित होती.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अंधेरी,मुंबई येथील शाखेमध्ये मार्गशीर्ष शुक्रवार दि.८ जानेवारी २०२१ रोजी गणेश पूजन करून ऑफिस सुरू करण्यात आले.
- 18 Jan 2021
अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष विजय खोचिकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार,सह कार्यवाह चैत्राली डोंगरे,संचालिका वर्षा उसगावकर,संचालक पितांबर काळे,सतीश रणदिवे,संजय ठुबे,ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगांवकर, वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी दिलीप दळवी,दिग्दर्शक रामदास तांबे,अभिनेते व निर्माते किरण कुडाळकर, दिग्दर्शक जय तारी, निर्मिती व्यवस्थापक कृष्णा शेलार,निर्माते उदय साटम,बाळा पांचाळ,अजमत खान आदी मान्यवर तसेच महामंडळाचे स्टाफ विशाल पवार,हेमंत परब,गीता परब,गणेश बहादूर उपस्थित होते.याप्रसंगी निर्माते उदय साटम,बाळा पांचाळ व परभणी चे निर्माते अजमत खान यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.अंधेरी शाखेप्रमाणे प्रभादेवी येथील शाखा चालूच राहणार आहे.
अंधेरी शाखा फोन नं-7208359256
प्रभादेवी शाखा फोन नं-9137389516
नवीन वर्षाची नवीन सुरुवात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले यांनी घेतली मराठवाडा कलावंतांची आढावा बैठक
- 18 Jan 2021
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले यांनी घेतली मराठवाडा कलावंतांची आढावा बैठक
( प्रतिनिधी )
2021वर्षाच्या आरंभालाच म्हणजे 1 जानेवारी 2021 रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मा. मेघराज राजे भोसले यांनी मराठवाडा दौऱ्याचे आयोजन केले होते.
सर्वप्रथम त्यांनी दौलताबाद येथे शूट होत असलेल्या चाभरे या वेब सिरीज च्या शूटिंग स्थळी भेट दिली ,
सिरीज चे निर्माते ,लेखक ,दिग्दर्शक रवी खरे, प्रसिद्ध विनोदी अभिनेते संदीप पाठक, डॉ. सुधीर निकम, प्रणव रावराणे आदींनी त्याने स्वागत केले. या वेळी कलावंतांच्या प्रश्नावर विस्तृत चर्चा करून कोरोना च्या संकर्मनाबद्दल सेटवर घ्यावयाची काळजी यावर ही त्यांनी मार्गदर्शन केले.
या नंतर सायंकाळी 7 वाजता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे उपस्थित कलाकार आणि सभासद यांनी फेट्याचा मन देऊन अध्यक्षांचे स्वागत केले. नंतर मराठवाड्यातील सदस्यांची विभागीय बैठक अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या वेळी विभागातून आलेल्या कलावंतांनी जिल्ह्यानिहाय त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केली. यावर विस्तृत चर्चा होऊन मराठवाड्यात महामंडळाचे कार्य तळागाळातील कलावंतांच्या पर्यंत जाण्यासाठी जिल्ह्यानिहाय समिती स्थापन करण्याचे ठरले.
ज्या कलावंतांना या समितीत पदभार स्वीकारून कार्य करण्याची इच्छा आहे अशा सभासदांची संघटन कौशल्य, आणि ज्ञान या निकषावर निवड केली जाईल असे अध्यक्षांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे समन्वय समिती प्रमुख डॉ. सुधीर निकम यांनी केले. या नंतर चाकूरकर मॅडम, शिवदर्शन कदम, संतोष वारे, सुनील सुलताने, कृष्णा सरणागत, जॉन भालेराव, निर्माते चंद्रकांत कायंदे सह अनेक मान्यवर सदस्यांनी आपले विचार आणि मते व्यक्त केली.या वेळी महामंडळाचे उमेश पाटील तसेच असंख्य सदस्य हजर होते.
या नंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.वसंत मुंडे यांना वाढदिवसाच्या निमित्य महामंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या, आणि भविष्यात चित्रपट महामंडळ आणि पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले.
अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या या दौऱ्याने मराठवाड्यातील कलावंतांच्यात चैतन्य आले असून येत्या काही दिवसात मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
मेघराज राजे भोसले यांची एमजीएम फिल्म आर्ट्स स्कुलला भेट
- 18 Jan 2021
औरंगाबाद दि. 4
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी एमजीएम फिल्म आर्ट्स स्कुलला भेट दिली. याप्रसंगी डॉ. रेखा शेळके आणि शिव कदम यांची उपस्थिती होती
महामंडळाच्या विविध उपक्रमांना मदत करण्यासाठी तसेच नवोदित कलावंत आणि निर्मात्यांना माफक दरात प्रशिक्षण देण्यासाठी एकत्रितपणे काम करता यावे म्हणून लवकरच एमओयू ( सामंजस्य करार)करण्यात येईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
एमजीएम मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आणि सध्या सुरू असलेल्या चित्रपट निर्मिती बद्दल मेघराज राजे भोसले समाधान व्यक्त केले.
सम्यक फिल्म परीवार या कलाकार संस्थेच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा कलाकार व तंत्रज्ञांच्या वतीने सम्यक फिल्म परीवारचे प्रमुख व चित्रपट निर्माता दिग्दर्शक सचिन रणपिसे यांच्या माध्यमातून सत्कार सोहळा पार प
- 18 Jan 2021
शुक्रवार दि. १८ डिसेंबर रोजी सह्याद्री करीअर अकॅडमी, बारामती येथे सम्यक फिल्म परीवार या कलाकार संस्थेच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा कलाकार व तंत्रज्ञांच्या वतीने सम्यक फिल्म परीवारचे प्रमुख व चित्रपट निर्माता दिग्दर्शक सचिन रणपिसे यांच्या माध्यमातून सत्कार सोहळा पार पडला. यावेळी कोरोना लाॅकडाऊन काळात कलाक्षेत्र ठप्प झाल्यामुळे अडचणीत आलेल्या कलाकारांना मदत केलेल्या तसेच कोरोना लढ्यात जनसेवा केलेल्या व्यक्तींना कलाकार व तंत्रज्ञांच्या वतीने कोव्हिड योध्दा सन्मान पत्र मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते दिले गेले.
यावेळी शशिकला फिल्म इंस्टिट्युट बारामतीचे चेअरमन तथा राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे प्रदेश युवा अध्यक्ष रविराज खरात,
चित्रपट अभिनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणिस महेशदादा देवकाते,
जय भूमीहिन सामाजिक व बहुऊद्देशिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल माने पाटील,
चित्रपट निर्माता राहुल घाडगे,
सामाजिक कार्यकर्ते विजय सोनवणे (डॅडी)
चित्रपट निर्माता शिवकुमार गुणवरे,
चित्रपट निर्माता प्रशांत शिंगटे
सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक संतोष रूपनवर
आदी मान्यवर ऊपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी कलाकार व तंत्रज्ञांच्या अडचणी समजून घेऊन ऊपस्थित कलाकार तंत्रज्ञांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजन सम्यक फिल्म परीवारचे संचालक गणेश खंडागळे यांनी केले. यावेळी सम्यक फिल्म परीवारचे एम डी भारत चव्हाण यांचा त्यांना नुकताच राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन सोहळा
- 07 Dec 2020
आज दि 1 डिसेंबर 2020 रोजी ठीक सकाळी 10 वाजता कॅमेरा मानस्तभं ,खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे साजरा करण्यात आला. जेष्ठ कामगार श्री.बाळकृष्ण बारामती व श्री.पंडित बोगाळे,तसेच श्रीमती विजयमाला पेंटर आणि संस्थेचे प्रभारी अध्यक्ष व उपाध्यक्ष श्री.धनाजी यमकर यांच्या हस्ते कलामहर्षी कै.बाबुराव पेंटर,कै.आनंदराव पेंटर यांच्या प्रतिमेचे व कॅमेरा मानस्तभाचे पूजन करण्यात आले यावेळी संचालक श्री.रणजित (बाळा) जाधव,श्री.सतीश बिडकर, स्वीकृत संचालक श्री.रवींद्र गावडे तसेच मराठी चित्रपट व्यवसायातील कलाकार तंत्रज्ञ व मान्यवर उपस्थित होते
*********
सुशांत शेलार
प्रमुख कार्यवाह
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ